राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष शिवदास कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांत पनवेल तालुका आणि रायगड जिल्ह्यात केलेल्या भरीव विकासकामांची ही पोचपावती आहे. “आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या कामांना भरघोस पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व पक्ष एकत्र येत महायुती केली आहे. या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता, पनवेल महानगरपालिकेत महायुतीला विक्रमी आणि मोठा विजय मिळणार, याबद्दल कोणतीही शंका नाही,” असा विश्वास कांबळे यांनी व्यक्त केला.