जालना: वसतीगृह की भग्न इमारत? सामाजिक न्याय विभागाचा निष्काळजीपणा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नरकयातना
Jalna, Jalna | May 20, 2026 जालना शहरातील संत रामदास शासकीय मुलांचे वसतीगृह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवार दि. 20 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना नरकयातना सहन कराव्या लागत असून, वसतीगृह नावापुरतेच उरले आहे की काय असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.