राधानगरी: इचलकरंजी : स्विफ्ट कारचा थरार! मध्यरात्री मेन रोडवर चार वाहनांना जोरदार धडक; तिघे गंभीर जखमी
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर शनिवार दिनांक 20 सप्टेंबर मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास एक स्विफ्ट चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना इतकी भीषण होती की धडक दिल्यानंतर स्विफ्ट कार सरळ रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली.या टक्करमुळे गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कारमधील दोघे जण देखील जखमी झाले आहेत.