अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील बांधणपट्टी–गणपतवाडी आदिवासीवाडीतील नागरिकांना वर्षानुवर्षे कच्च्या व अरुंद रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात गरोदर महिला, आजारी व वयोवृद्धांना दळणवळण अशक्य होत होते. ही गंभीर बाब लक्षात घेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी तत्काळ पुढाकार घेत रस्त्याच्या सिमेंट काँक्रिट कामास सुरुवात केली. या प्रश्नाबाबत केणी यांनी ग्रामस्थांसह तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेतली.