जालना: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात; ६ लाख ४० हजाराची लाच घेताना अटक
Jalna, Jalna | Jun 6, 2026 जालना जिल्ह्याच्या महसूल प्रशासनाला हादरा देणाऱ्या कारवाईत अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांना ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. शनिवार दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मासिक हप्त्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याचा आरोप असून, छत्रपती संभाजीनगर येथे ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.