पेण: पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपी अटकेत
Pen, Raigad | Aug 29, 2025 रायगड जिल्ह्यातील पेण पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 01 मार्च 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 01 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीत आरोपीने अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असूनदेखील आरोपीने तिच्यावर दबाव टाकला, तिच्या नावाची बदनामी करण्याची धमकी दिली तसेच तिला मारहाण केली.