मानगाव: अंबरले येथे भैरी मंदिराचे बुधवारी प्राणप्रतिष्ठा
मंत्री भरत गोगावले राहणार उपस्थित
Mangaon, Raigad | Nov 25, 2025 अंबरले गाव हे रायगड किल्ल्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर स्थित असून शिवकालीन परंपरा आणि ऐतिहासिक वारसा यासाठी ओळखले जाते. गावातील भैरी देवस्थान हे अनेक वर्षांपासून ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. आता या देवस्थानाच्या नव्या मंदिराचे बांधकाम झाले असून, त्यासाठी ग्रामस्थ, मंदिर समिती आणि स्थानिक भक्त एकत्र आले आहेत.मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना आणि उद्घाटन सोहळ्याच्या आयोजनासाठी गावात विशेष तयारी सुरू असून, भजन, कीर्तन, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.