रक्षाबंधनानंतर बहिण भावाचा दुसरा मोठा सण भाऊबीज आहे.रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला राखी सोबत पत्र पाठवते. ओवाळणीत फक्त तुमचे प्रेम मागते.पण या भाऊबीजेला मला तुमच्याकडून ओवाळणीत काही खास हवे आहे. ते म्हणजे तुम्ही कुठलेही व्यसन करु नये, वाईट मार्गाचा अवलंब करु नये. माझे भाऊ मला नक्कीच ही ओवाळणी देतील असा माझा ठाम विश्वास आहे. असे मत ॲड.माधुरी देवानंद पवार. अध्यक्षा सप्तश्रृंगी महिला अर्बन सोसायटी,जानेफळ यांनी व्यक्त केले आहे.