कारंजा: गिट्टी खदान रोडवर शेतात सुरू होता जुगार.. पोलिसांनी घातली धाड ..चार आरोपी ताब्यात तीन लाख 11 हजार 850 रुपयांचा माल जप्त
Karanja, Wardha | Nov 29, 2025 मोजा पिंपळखुटा गावा जवळ असलेल्या गिट्टीखदान रोडवरील शेतामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच दिनांक 28 तारखेला पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी धाड घालून चार जुगारिना ताब्यात घेतले त्यांच्यावर अपराध क्रमांक 0772/2025 कलम 12 महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून चारही आरोपींना सूचना पत्रावर रीहा करण्यात आले. जुमला किंमत तीन लाख 11 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली..