शिर्डी जवळील सावळी विहीर MIDC रोडवर दुर्दैवी अपघातात शिर्डी संस्थांनाच्या विदयुत विभागात कार्यरत असणारे संतोष हरिभाऊ पगारे वय 32 यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार सावळी विहीर MIDC परिसरात सिमेंटच्या पुलाचं काम सुरु आहे. रात्रीच्या वेळी घरी जात असताना चालू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने ते समोरील बांधकामच्या खड्ड्यात पडले. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. घटना रात्री घडली पण अंधार असल्याने व जास्त वर्दळ नसल्याने हि बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. सकाळी घटनेच