खरीप २०२५ मध्ये विहीत मुदतीत ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाने ऑफलाईन पीक पाहणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी १७ ते २४ डिसेंबरदरम्यान ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे अर्ज करावेत, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. अर्जानंतर २५ डिसेंबर ते ७ जानेवारीदरम्यान ग्रामस्तरीय समिती प्रत्यक्ष शेतात स्थळपाहणी करणार आहे. पंचनामा, स्थानिक चौकशी व कागदपत्रांच्या आधारे अहवाल तयार करून पुढील कार्यवाही केली ज