पुणे शहर: बजाज कंपनीच्या 'एथर' सर्व्हिसिंग सेंटरला मोठी आग, आगीत 30 ते 40 गाड्या जळून खाक.
Pune City, Pune | Oct 21, 2025 गझेबो हॉटेलच्या मागे असलेल्या बजाज कंपनीच्या 'एथर' (Ather) इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या सर्व्हिसिंग सेंटर असलेल्या पत्र्याच्या गोडाउनला पहाटे 3.00 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या भीषण आगीत गोडाऊनमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेल्या सुमारे ३५ ते ४० दुचाकी गाड्या आणि इतर मौल्यवान साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.