जालना: जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; नव्या आयुक्त अंजली शर्मा अर्ध्या सभेतून बाहेर, नगरसेवक वीरेंद्र धोका आक्रम
Jalna, Jalna | Apr 6, 2026 आज दिनांक सहा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या नव्याने रुजू झालेल्या आयुक्त अंजली शर्मा या पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्या होत्या. मात्र सभेदरम्यान शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आणि त्यानंतर वातावरण अधिकच तापले. नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अंजली शर्मा यांनी आज जालना महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्