खालापूर: खोपोली–मुंबई लोकल ट्रेन बैल धडकेमुळे ठप्प — प्रवाशांची ट्रॅकवरून पायी चालत सुटका,
काही वेळानंतर वाहतूक सुरळीत
खोपोलीहून मुंबईच्या दिशेने जाणारी संध्याकाळी 6.02 वाजताची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकल गाडी मंगळवारी संध्याकाळी केळवली आणि पळसदरी स्थानकादरम्यान अचानक थांबली, कारण एका बैलाचा रेल्वे रुळांवर मृत्यू झाल्याने तो चाकाखाली अडकला होता. घटनेनंतर रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प राहिली. अपघातात दोन बैलांना धडक बसल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. बचाव पथकाला बैलाचे अवशेष ट्रॅकवरून हटविण्यात अडचणी येत होत्या, त्यामुळे गाडी बराच वेळ थांबून राहिली.