जळगाव: रामनगर आणि काव्यरत्नावली चौक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; तीन ठिकाणी चोरी, रोकडसह दागिने लांबविले
जळगाव शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, रामनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून सोने आणि रोकड लंपास केली, तर काव्यरत्नावली चौकात दोन दुधाच्या टपऱ्या फोडून गल्ल्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना सोमवारी ५ मे रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे.