पोलादपूर: कशेडी घाटात इको कार संरक्षण भिंतीवर धडकून पलटी; एक ठार पाच जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबई बाजूकडून गोवा दिशेने जाणाऱ्या इको कारला अपघात होऊन कार पलटी झाल्याने एक ठार तर पाच जण जखमी झाल्याची घटना भोगाव हद्दीत गुरुवार रोजी पहाटे ३.१५ वाजताच्या सुमारास घडली आहे. इको कार चालक लिंगप्पा कंटेपा पातारे वय २८ रा. निगडी पुणे आपल्या ताब्यातील इको कार क्रमांक एम एच १४ के एस ०२३१ घेऊन मुंबई बाजू कडून गोवा दिशेने जातअसताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठड्यावर कार आदळून पलटी झाली या अपघातात १ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत.