एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कमी खर्चाचे कांदाचाळ, लसून साठवणूक गृह हा घटक राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत शेतक-यांना 5 ते 25 टन, 25 ते 500 टन व 500 ते 1 हजार टन क्षमतेच्या कांदा चाळ व लसून साठवणूकीरीता गृह उभारणीसाठी क्षमतेनुसार प्रकल्पाच्या 50 अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.