अकोल्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पळसो बढे येथील १९९७-९८ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल २७ वर्षांनी हॉटेल विनस इंटरनॅशनल येथे उत्साहात संपन्न झाला. माजी मुख्याध्यापिका प्रतिभाताई देशमुख आणि ‘चला हवा येऊ द्या’ फेम कलाकार किशोर बळी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम रंगतदार झाला. ८३ विद्यार्थ्यांनी हजेरी लावत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांचे सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी केला.