अकोला: टिळक रोडवर ट्राफिक जाम, नागरिक हैराण
Akola, Akola | Oct 20, 2025 20 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास दिवाळी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे टिळक रोडवरील जनता मार्केट चौकात प्रचंड ट्राफिक जाम निर्माण झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्राफिक नियंत्रित करताना पोलिसांनाही कसरत करावी लागली. जाममुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ट्राफिक सुरळीत होईपर्यंत पोलिसांनी सतत प्रयत्न केले.