मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर आज शनिवार दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी लोणावळा आणि खोपोली परिसरात दोन वेगवेगळे गंभीर अपघात झाले. या अपघातांमध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर खोपोली हद्दीत झालेल्या दुसऱ्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना तातडीने खोपोली नगरपरिषद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.