पुणे ग्रामीण जिल्ह्यात आगामी नगरपालिकांच्या, नगरपरिषदांच्या तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू आहे.याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील एक धोकादायक सराईत गुन्हेगार एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आला आहे.