जालना: वालसावंगी, वडोद तांगडा शेतशिवरात झालेल्या पावसामुळे मिरची पीक बहरले
Jalna, Jalna | Jul 3, 2026 आज दिनांक 3 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालन्याच्या वालसावंगी ,वडोद तांगडा या परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांना जीवनदान आले आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी वर उन्हाळ्यात हिरवी मिरची लागवड केली व विकतचे पाणी आणून ही मिरची वाचवण्याचा प्रयत्न केला ती मिरची सुद्धा या पावसाने आता बहरली असून शेतशिवारात व परिसरात सर्व मिरचीचे राहणे हिरवेगार व मिरच्या लागल्याचे पाहायला मिळाले आहे.