परभणी: शहरातील बाबर कॉलनी येथे घरावर वीज कोसळली
परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील बाबर कॉलनी येथे आज सोमवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 30 वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊसात शेख एजाझ यांच्या घरावर वीज कोसळली,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र घरच्या छतावर असलेल्या कबूतर च्या घरावर ही वीज कोसळल्याने पशुधनचे नुकसान झाले, तसेच वीज छताला भेदल्याने त्याठिकाणी खड्डा पडला आहे. तसेच घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत.