दिग्रस: शहरातील आर्णी बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच, मोक्षधामजवळ पुन्हा एक अपघात, नागरिकांची गतिरोधक बसवण्याची मागणी
आर्णी बायपासवरील मोक्षधाम परिसरात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मोक्षधामकडून येणाऱ्या वाहनचालकांना आर्णी दिशेने येणारी वाहने स्पष्ट दिसत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. सिमेंट रस्त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्याने वाहनांचा वेग अधिक राहतो, त्यामुळे धडकांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी आधीच अनेक मोठे आणि किरकोळ अपघात झाले असून दररोज एखादा किरकोळ अपघात घडत आहे. सुसाट वाहनाचा एक दुचाकीला आणि एका पादचारीला धडक दिल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला.