तिरोडा: प्रहार पक्ष तिरोडा तालुकाध्यक्षांनी शरीरावर कागदपत्रे चिकटवून व त्यावर समस्या लिहून जिल्हाधिकारी कार्यालयात दिले निवेदन
Tirora, Gondia | Sep 19, 2025 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एका अनोख्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले, ज्यामध्ये तिरोडा तालुका परिसरातील पोलिस ठाणे, शेती, सिंचन, रेल्वे निवेदने, गाड्या आणि पशु विमा यासह १४ मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. या मागण्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे त्यांनी १४ मागण्या कागदावर लिहून, त्या स्वतःच्या शरीरावर चिकटवून दि.१९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.