मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मानवी जीव व पक्ष्यांसाठी घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही, आदेशाचे उल्लंघन करून त्याची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यावर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान मौजा करडी येथील गांधी वार्डात असलेल्या यशवंत किराणा दुकानावर पोलीस हवालदार कुंभरे यांनी छापा टाकला असता, आरोपी यशवंतराव सुकराम डोहळे (५०, रा. आंबेडकर वार्ड, करडी) याच्या ताब्यातून ४,००० रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा साठा विक्रीसाठी उपल