नायगाव-खैरगाव: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; मदतीचा प्रश्न मार्गी लावू - कुंचेली येथे डॉ. मिनलताई खतगावकर यांचे प्रतिपादन
नांदेड जिल्ह्याचे युवा नेतृत्व डॉ. मिनलताई खतगावकर यांनी आजरोजी जिल्ह्यातील विविध अतिवृष्टीग्रस्त गावातील शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समश्या जाणून घेतल्या आहेत, यावेळी कुंचेली गावात त्यांनी प्रसार माध्यमांशी आजरोजी दुपारी 2 च्या सुमारास बोलतांना म्हणाल्या की जिल्ह्यात अतिवृष्टीमूळे शेतकऱ्यांची हाताशी आलेली पिके ही उध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून त्यांना मदत देण्यात यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहेत.