चांदूर रेल्वे: सुपलवाडा येथे विनाकारण युवकास मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल
हरीश मसराम याने राहुल उईके यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .हरीश हा त्याच्या घराजवळ ग्रामपंचायतचे बेंचवर बसला असता ,राहुल हा दारू पिऊन हातात काठी घेऊन आला. हरीशला येते का बसला म्हणून लोटलाट केले व काठीने पायाच्या टोंगळ्याजवळ मारून जखमी केले .हरीश चे ऑपरेशन इर्विन ला झाले .राहुल तिथे आला व आपण नातेवाईक आहे तुझा दवाखान्याचा खर्च देतो असे म्हटले परंतु त्याने खर्च दिले नाही. खर्च मागितले असता तुझ्याकडून जे होते ते करून घे अशी धमकी दिली .अशी तक्रार पोलिसात हरीश ने दिली आहे .