चिखलदरा: बेपत्ता तरुणाचा पर्सपॅक्टिव्ह जंगलात झाडाला लटकलेला आढळला मृतदेह;चिखलदरा पोलिसांनी केला पंचनामा
चिखलदरा येथे चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बबलू बुडला सावलकर (वय ३५, रा. मरियमपूर) याचा मृतदेह पर्सपेक्टिव्ह पॉइंटजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आज सकाळी ११:३० वाजता आढळला.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बबलू सावलकर १० ऑक्टोबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होता.सोमवारी सकाळी वनकर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.