तुमसर: सक्करदरा येथे एका इसमाला मोटरसायकलची धडक, आरोपी मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील सिहोरा पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा सक्करदरा येथे दि. 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला सायं. 6 वा.च्या सुमारास विजेश रमेश खुणे व त्याचे वडील रमेश खुणे हे आपली म्हैश घेऊन घराकडे जात असता यातील आरोपी रोशन जयराम मेश्राम रा.येरली याने आपल्या ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने चालवून विजेश खुणे याला जबर धडक दिली. यावेळी आरोपीच्या मागे बसणाऱ्या इसमास गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी आरोपी मोटरसायकल चालकाविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.