रोहा: कर्जतमध्ये प्रचारात उतरणार, बळाचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य उत्तर देणार, खा. सुनील तटकरेंचा इशारा
दिग्गज नेत्यांचा प्रवे
Roha, Raigad | Nov 9, 2025 कर्जत मतदार संघात पुन्हा एकदा राजकीय वारे फिरले असून खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण स्वतः प्रचारात उतरणार असून बळाचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल असा इशारा देत खा. सुनील तटकरे यांनी आ. महेंद्र थोरवे यांना आव्हान दिले.खोपोलीचे माजी नगरसेवक किशोर पानसरे, ठाकरे गटाच्या माधुरी तांबे नेत्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.