परभणी: पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण
राजगोपालचारी उद्यान येथे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी खा.संजय जाधव, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक यांच्य