पनवेल तालुक्यातील उसर्ली परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, यामुळे उसर्ली परिसराचा कायापालट होणार आहे. या सोहळ्यात प्रामुख्याने रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले.