हातकणंगले: हुपरीत सीसीटीव्ही अनेक कॅमेरे बंद, नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, तहान लागल्यानंतर विहीर का?" असा थेट सवाल
देश-विदेशात चांदी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरी गावात सध्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गावात चोरी, हाणामाऱ्या व अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.हुपरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून गावात सुमारे २० ते २२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.या कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हा घडल्यानंतर आरोपींचा शोध घेणे सुलभ झाले होते.