रायगड जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी झालेली निवडणूक प्रक्रिया बुधवारी पार पडली असून, यात पाली सुधागड पंचायत समितीवर महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआयच्या महायुतीची बिनविरोध सत्ता प्रस्थापित झाली असून, सुधागडच्या राजकीय इतिहासात प्रथमच सभापती पदाचा बहुमान भारतीय जनता पार्टीला मिळाला आहे. सभापती पदी भाजपच्या जागृती राजेश मानकर यांची, तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली आहे.