भोकरदन: केदारखेडा येथे मध्यरात्रीच्या सुमारात जनावराच्या गोठ्याला आग लागून 5शेळ्या 2 बोकड्यांचा होरपळून मृत्यू
आज दिनांक 2 जून 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे दिनांक 1 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केंद्रखेडा येथील शेतकरी दिलीप भानुदास जाधव यांच्या गट क्रमांक 135 मध्ये असलेल्या शेतातील जनावरांच्या गोट्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागून यादीत 5 शेळ्या 2 बोकडे होरपळून मृत्यू झाली आहे,तर 2बैल1गाय व 2 वासरे गंभीर जखमी झाले आहे. त्यात शेतकऱ्याचे लाखोंच नुकसान झाले असून प्रशासनाचे आर्थिक मदत करण्याची मागणी जोर धरत आहे.