ठाणे: ठाणे महापालिकेकडून समाजसेवक संगम डोंगरे यांच्या आंदोलनाची दखल, नौपाडा येथील खड्डा बुजवण्याचे काम सुरू
Thane, Thane | Oct 18, 2025 नौपाडा येथील गोखले रोडवर रस्त्यावर खड्डा पडला होता. त्यानंतर ठाण्यातील समाजसेवक संगम डोंगरे यांनी खड्ड्याला हार घालून निषेध व्यक्त केला होता. मात्र आता संगम डोंगरे यांच्या आंदोलनाची दखल ठाणे महापालिकेने घेतली असून आज हा खड्डा बुजवण्याचे काम सुरू करण्यात आल आहे. या संदर्भात आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास संगम डोंगरे यांनी माहिती दिली आहे.