22 डिसेंबरला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीतील बैद्यनाथ चौक येथून नंदू धामणीया वय 62 वर्ष हे पायदळ जात असताना लाल परीचा चालक गोकुळ ठेवणे याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवून नंदूला धडक दिली त्याला उपचारासाठी मेडिकल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकारणी प्राप्त तक्रारीवरून इमामवाडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.