जालना: बाजी उमरद येथे विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू; सासरच्या छळाचा आरोप
Jalna, Jalna | Jul 18, 2026 जालना तालुक्यातील बाजी उमरद येथे 27 वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांकडून सतत छळ व मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात येत असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृत महिलेचे नाव सगुना रामेश्वर पवार (वय 27, रा. बाजी उमरद) असे आहे. त्यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षीही सगु