लाखांदूर: चपराड पहाडी येथील दुर्गा माता मंदिर परिसरात अस्वलाचा धुमाकूळ
तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत असलेले चपराड पहाडी येथील दुर्गा माता मंदिर परिसर येथे अस्वलाने धुमाकूळ घातला असल्यामुळे सदर परिसरातील पूजा सामग्री विकणारे छोटे व्यावसायिकांना याचा अधिक फटका बसत आहे तर तर तारीख 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता पुन्हा अस्वलाने सदर मंदिर परिसरात येऊन धुमाकूळ घातला त्यामुळे अनेक छोट्या व्यवसायिकाचे नुकसान झाले असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी यावर संबंधित विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली