श्रीवर्धन: हरिहरेश्वर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेला उत्साहात प्रारंभ
पालखी सोहळा आणि ‘कोस प्रदक्षिणा’ भाविकांचे आकर्षण
सागरकिनारी वसलेल्या हरिहरेश्वर या धार्मिक स्थळी कार्तिकी एकादशीनिमित्त आज (दि. १ नोव्हेंबर) पासून पारंपरिक आणि उत्साहवर्धक यात्रेला प्रारंभ झाला आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे पालखी सोहळा आणि ‘कोस प्रदक्षिणा’. आज पहाटे श्री हरिहरेश्वर मंदिरात पालखी पूजनानंतर यात्रेचा शुभारंभ झाला. या वेळी मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले.