जळगाव शहरातील निमखेडी येथे दारूच्या नशेत येवून तरूणाच्या आईला व मुलाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी २ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घडली. याबाबत बुधवारी ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.