अकोला: वाशिम बायपासवरील ऐका बारमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी; आरोपींना जुने शहर पोलिसांनी केली अटक
Akola, Akola | Sep 25, 2025 जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी दिनांक 25 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजता माहिती दिली की, वाशिम बायपास रोडवरील ऐका बारमध्ये दोन गटांमध्ये बिल देण्याच्या वादावरून हाणामारी झाली होती या घटनेनंतर दोन्ही गटातील आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ठाणेदारांनी सांगितले.