रोहा: रोहा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ रायगड यांच्या वतीने नवतेजस्विनी गारमेंट युनिटचा उद्घाटन समारंभ
Roha, Raigad | Oct 31, 2025 आज शुकवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास रोहा येथील डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळ, रायगड यांच्या वतीने ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’चा उद्घाटन समारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, रोहेकर बंधु-भगिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना, “आपल्या रोहा भागात नवतेजस्विनी गारमेंट युनिट सुरू होत असून, हे परिसरातील माता-भगिनींना आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.