दिग्रस: नगर परिषद निवडणुकीत तिसऱ्या दिवशीही फक्त एकच अर्ज; ऑनलाईन जाचक प्रक्रियेमुळे उमेदवारांची गती मंदावली
दिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी, आज बुधवार दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, प्रभाग क्रमांक १ मधून धर्मराज अभिमन्यू गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. १० नोव्हेंबरपासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत केवळ चार उमेदवारांनीच आपले अर्ज दाखल केले आहेत. नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबरपर्यंत असून अजून पाच दिवस बाकी आहेत. अर्ज दाखल करण्याचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.