महिनाभरापासून विधानसभेचा उडालेल्या प्रचाराचा धुरळा सोमवारी सायंकाळी पाच वाजता शांत झाला. बोईसर विधानसभेत महाविकास आघाडी, महायुती, बहुजन विकास आघाडी, मनसे व जिजाऊ निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे असून बुधवारी थेट लढत होणार आहे. बुधवारी मतदान तर शनिवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सर्व प्रमुख पक्ष्यांच्या उमेदवारांसह अन्य राजकीय पक्ष अपक्ष आणि मतदारांच्या भेटीगाठी रविवारी व सोमवारी भर दिला.