भोकरदन: गोंधनखेडा येथे गोपाल आश्रमातील गौरीशंकर महादेव मंदिरामध्ये मा.मंत्री रावसाहेब दानवेनी घेतले महादेव पिंडीचे दर्शन
आज दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भोकरदन जाफराबाद या विधानसभा मतदारसंघातील गोंधळ खेडा येथे गोपाल आश्रमातील गौरीशंकर महादेव मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आहे. याप्रसंगी त्यांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांशी वाई भक्तांची तसेच संत महंतांची विविध मुद्द्यावर संवाद साधला आहे,यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व भावी फक्त उपस्थित होते.