वाशिम: दिवाळी महोत्सव निमित्त उमेद अभियानांतर्गत बचत गटांच्या वस्तु विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन.
Washim, Washim | Oct 15, 2025 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे हस्ते आज (बुधवार दि. १५) उमेद अभियानाच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद अभियानात कार्यरत बचत गटातील महिलांनी स्व उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन येथील जिल्हा क्रीडा मैदानात सुरू करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रदर्शनीच्या उद्घाटनानंतर उपस्थित महिलांशी संवाद साधला. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली.