सेनगाव: सेनगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने बालकाचे हक्क व अधिकार जनजागृती कार्यक्रम संपन्न
सेनगाव तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सेनगाव शहरातील भानेश्वर विद्यालय या ठिकाणी आज बालकाचे हक्क व अधिकार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डी आर थिगळे व प्रमुख वक्ते एडवोकेट एम पी कांबळे हे होते. तसेच याप्रसंगी श्री जे एन मद्दे भानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप बुद्रुक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.