जालना: तक्रार निवारण दिनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २८९ हून अधिक तक्रारींचे निवारण
नागरिकांना दिलासा; पोलीस अधिकाऱ्यांची
Jalna, Jalna | May 24, 2026 तक्रार निवारण दिनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २८९ हून अधिक तक्रारींचे निवारण नागरिकांना दिलासा; पोलीस अधिकाऱ्यांची थेट उपस्थिती.. आज दिनांक 24 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना पोलीस दलाच्या वतीने दिनांक २३ मे २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये “तक्रार निवारण दिन” उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल २८९ पेक्षा अधिक तक्रारींचे निवारण करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे